सासूने दागिने काढून घेतले आणि मारहाण केली, ऐश्वर्या रायचे गंभीर आरोप

2512

घरगुती हिंसाचार हा प्रश्न खूप गंभीर आहे. या संकल्पनेची व्याप्ती मोठी असली तरी विवाहित महिलांचा सासरच्यांकडून किंवा नवऱ्याकडून होणाऱ्या छळाचे आरोप यात सर्वाधिक असल्याचं दिसून येत आहे. कारण, ऐश्वर्या राय हिने आपल्या सासूवर मारहाणीचा आरोप केला आहे.

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची सून ऐश्वर्या राय हिने तिची सासू राबडी देवी यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. ऐश्वर्याने केलेल्या आरोपांनुसार, पाटणा विद्यापीठात ऐश्वर्याचे वडील चंद्रिका राय यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केलेली पोस्टर्स लागली होती. याबाबत ऐश्वर्या हिने राबडी यांना विचारणा केली. पण, त्यावर राबडी यांनी आपल्याला मारहाण केली. आपले केस ओढले, दागिने काढून घेतले आणि धक्के मारत घरातून हाकलून दिलं, असे आरोप ऐश्वर्या राय हिने केला आहे.

या प्रकरणी चंद्रिका राय यांनीही कडाडून टीका केली आहे. लालू यादव यांच्या कुटुंबाकडून त्यांना अशा वागणुकीची अपेक्षा नव्हती, असं राय यांनी म्हटलं आहे. राबडी देवी या नेहमी महिलांवरील अत्याचारावर बोलत असतात. पण, स्वतःच्याच सुनेवर अत्याचार करतात. आता आम्ही हे सहन करू शकत नाही. आता लालूंच्या कुटुंबाचा पर्दाफाश करावाच लागेल, असं चंद्रिका राय यांचं म्हणणं आहे.

ऐश्वर्या हिने तेजप्रताप यादव याच्याशी घटस्फोट घेण्याचं निश्चित केलं आहे. त्यानुसार घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून त्यावर 17 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या