पाकिस्तानात सापडली ऐश्वर्या रायची डुप्लिकेट!

सोशल मिडीयावर दररोज नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. त्यामुळे अनेक युजरना आश्चर्य वाटते आणि त्याबाबत चर्चाही होते. आता पाकिस्तानात ऐश्वर्या राय बच्चन हिची डुप्लिकेट सापडली असून सोशल मिडीयावर तिची चर्चा होत आहे. पाकिस्तानातील ही मुलगी हुबेहुब अभिनेत्री ऐश्वर्या रायसारखी दिसते. तिचे ऐश्वर्याच्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

पाकिस्तानातील आमना इमरान इंस्टाग्राम अंकाउंटवर चर्चेत आहे. तिचा लूक ऐश्वर्या रायसारखाच आहे. अनेक राजकीय नेते, हॉलीवूड, बॉलीवूडमधील कलाकार यांच्या डुप्लिकेटची चर्चा नेहमी होत असते. मात्र, ऐश्वर्या आणि तिची डुप्लिकेट असलेल्या आमनामधील साम्यांमुळे याची चर्चा रंगली आहे. आमनाने इंस्टाग्रामवर स्वतःचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यात तिने ऐश्वर्यासारख्या लूकमधील काही फोटो आहेत. त्यात आमना कोणती आणि ऐश्वर्या कोणती असा प्रश्न यूजरला पडतो, एवढे या दोघांमध्ये साम्य आहे.

आमना इमरान एक ब्यूटी ब्लॉगर आहे. ती ऐश्वर्यासारखी दिसते. तसेच ती ऐश्वर्याची कॉपीही हुबेहुब करते. ती इंस्टाग्रामवर स्वतःचे आणि ऐश्वर्याचे एकत्र फोटोही शेअर करते. काही व्हिडीओमध्ये ती ऐश्वर्यासारखे हावभाव करताना दिसत आहे. पाकिस्तानच्या अनेक न्यूज प्लॅटफॉर्मवरही आमनाची चर्चा आहे.
ती कधी साडी नेसलेला तर कधी फॉर्मलमधील आपला फोटो शेअर करते. त्यात अनेक फोटोंमध्ये ती ऐश्वर्यासारखीच दिसते.

इंस्टाग्रामवर तिचे अडीच हडारपेक्षा जास्त पॉलोअर्स आहेत.तिचे अंकाउंट वेगाने व्हायरल होत आहेत. तिच्या फोटोंना लाईक मिळत असून ते मोठ्या प्रमाणात शेअरही करण्यात येत आहेत. आमनाच्या आधीही अनेकजणींचा चेहरा ऐश्वर्या रायसारखा असल्याची चर्चा होती. मात्र, आमना आणि ऐश्वर्यामधील साम्य सगळ्यांनाच बुचकळ्यात पाडत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या