‘सरबजीत’ फेम अभिनेता रंजन सहगल यांचे निधन

‘सरबजीत’ फेम अभिनेता रंजन सहगल याचे निधन झाले आहे. वयाच्या 36 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.  सहगल हे बऱ्याच काळापासून आजारी होते आणि त्यांच्या अनेक अंगांनी काम करणे बंद केले होते. अखेर शनिवार त्यांची प्राणज्योत मालवली.

रंजन सहगल यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली. CINTAA ने ट्विट करून या गुणी अभिनेत्याच्या आठवणी ताज्या करत तशोक व्यक्त केला. 2010 मध्ये ते
CINTAA चे सदस्य होते.

रंजन सहगल यांनी अनेक चित्रपटात सहकलाकार म्हणून काम केले होते. ‘सरबजीत’ चित्रपटात त्यांनी रवींद्र पंडित यांची भूमिका केली होती. तसेच ‘फोर्स’, ‘कर्मा’, ‘माही एनआरआय’मध्ये देखील ते दिसले. यासह ‘क्राइम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’, ‘तुम देना साथ मेरा’, ‘कुलदीपक’ सारख्या मालिकेत काम केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या