अजमल कसाबला ‘भारत माता की जय’च्या घोषणा द्यायला लावल्या होत्या- राकेश मारिया

3231

26/11 हल्ल्यातील पकडलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला भारत मातेच्या घोषणा द्यायला लावल्या होत्या. राकेश मारिया यांनी आपले पुस्तक ‘Let Me Say It Now या पुस्तकात हा खुलासा केला आहे. तसेच हिंदुस्थानात मुसलमान लोक नमाज पढतात हे पाहून त्याला कसाबला आश्चर्य वाटले होते असेही मारिया यांनी पुस्तकात म्हटले आहे.

मारिया यांनी पुस्तकात म्हटले आहे की, “ कसाबला जेव्हा अटक केली तेव्हा त्याला शवागरात नेण्यात आले होते. तिथे हल्ल्यात मृत्यू पावलेल्या 160 नागरिकांचे मृतदेह ठेवण्यात आले होते. हे मृतदेह कसाबला दाखवण्यात आले आणि हाच तुझा जिहाद आहे का असे विचारण्यत आले. तसेच त्याच शवगरात त्याच्या साथीदारांचेही मृतदेह ठेवण्यात आले होते. त्यांचे मृतदेह पाहून कसाब चांगलाच बिथरला त्याला उल्टीसारखे होत होते.”

नंतर पोलिसांचा ताफा मेट्रो जंक्शन जवळ आला. याच ठिकाणी कसाब आणि त्याच्या साथीदारांनी बेछूट गोळीबार केला होता. तिथे अनेक निष्पाप नागरिक आणि पोलीस कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. राकेश मारिया यांनी तिथे गाडी थांबली. कसाबला बाहेर काढले. पहाटेचे 4.30 वाजले होते. मारिया यांनी कसाबला खाली वाकायला सांगितले आणि अपाले डोके जमिनीवर टेकायला सांगितले. कसाब सर्वकाही ऐकत होता. मारिया यांनी कसाबला भारत माता की जय म्हणायला सांगितले. त्याने एकदा भारत माता की जय अशी घोषणाही दिली. तरी मारिया यांचे समाधान झाले नाही. त्यांनी पुन्हा घोषणा देण्यास सांगितले. कसाबने पुन्हा भारत माता की जय ची घोषणा दिली, असे मारिया यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले आहे.

हिंदुस्थानी मुस्लिमांबद्दल कसाबचे गैरसमज होते असे मारियांनी पुस्तकात म्हटले आहे. त्याला वाटले की हिंदुस्थानात मुस्लिमांना नमाज पढण्यावर बंदी आहे, तसेच मशीदींना टाळे लावले असतात असे त्याला सांगितले गेले. परंतु तुरुंगातून जेव्हा तो पाच वेळा अझान ऐकायचा तेव्हा तो आश्चर्यचकीत झाला. मेट्रो सिनेमाजवळ एक मशीद आहे, तिथे लोक नमाज पढतात हे कसाबला दाखवण्यात आले. ते चित्र पाहून खूप आश्चर्य वाटल्याचे मारियांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या