आजरा सशस्त्र दरोडाप्रकरणी 8 संशयित पोलिसांच्या ताब्यात; 12 जण रडारवर; चौघांचा शोध सुरू

आजरा तालुक्यातील खानापूर-रायवाडा येथील माजी सरपंच गुरव यांचे घर, काजू फॅक्टरी आणि वराह पालन युनिटवर पडलेल्या सशस्त्र्ा दरोडय़ाप्रकरणी बुधवारी रात्रीच पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करून आज सहभागी असलेल्या 12 पैकी 8 जणांना ताब्यात घेऊन मुद्देमालही जप्त करण्यात यश मिळवले आहे. उर्वरित संशयित चौघांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची सूत्रे वेगवान झाली आहेत.

आजरा तालुक्यातील खानापूर-रायवाडा येथील माजी सरपंच पूनम गुरव, त्यांचे पती बँक मॅनेजर प्रल्हाद आणि मुलगा राजेश यांना मंगळवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी शस्त्र्ााचा धाक दाखवून सुमारे सव्वा नऊ लाखांपर्यंतचा ऐवज लुटला होता. तसेच, मराठी-कन्नड बोलणाऱया दरोडेखोरांच्या टोळक्याने ट्रकमधून डुक्करही पळवले होते. या सशस्त्र्ा दरोडा प्रकरणातील एका दरोडेखोराला 24 तासांत जेरबंद करण्यात पोलीस यशस्वी ठरले. रवी लक्ष्मण नाईक असे त्याचे नाव आहे. त्यानंतर आज दिवसभरात त्याच्या अन्य 7 साथीदारांना जेरबंद करण्यात आले. याबरोबरच त्यांनी चोरलेल्या 70-75 वराहांसह अन्य सोने, चांदी अलंकारही पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणातील उर्वरित 4 साथीदारांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.

दरोडय़ाच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास करून बेळगावनजीकच्या रुक्मिणीनगरमधून नाईकला ताब्यात घेतले. त्यांनी कर्नाटकातील खानापूरच्या जंगलात लपवलेले वराहही ताब्यात घेण्यात आले. संबंधित दरोडा 12 जणांनी घातल्याची कबुली संशयिताने दिल्यावर इतरांची धरपकड सुरू झाली. आतापर्यंत या प्रकरणातील 8 जण ताब्यात घेतले आहेत. सर्वच संशयित पोलीस रेकॉर्डवर गुन्हेगार म्हणून आधीपासूनच नोंद आहे. पोलिसांनी या गुह्यात वापरलेल्या दोन पिकअप जीप वाहनेही ताब्यात घेतली आहेत. आजरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी नेसरी, गडहिंग्लज आणि कर्नाटक पोलिसांच्या मदतीसह जिह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या मार्गदर्शनानुसार तपास सुरू ठेवला आहे.