सहजीवनाची 22 वर्षे! अजयने व्यक्त केले काजोल बद्दलचे प्रेम

नव्वदीच्या दशकातले अनेक चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे अजय आणि काजोल या जोडीचा ‘प्यार तो होना ही था’. या चित्रपटाला 22 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक खास व्हिडीयो शेअर करत अजयने काजोबद्दलच्या आपल्या भाकना व्यक्त केल्या आहेत.

‘रिल आणि रियल लाईफची 22 वर्षे’ अशी कॅप्शन अजयने या व्हिडीयोला दिली आहे. या व्हिडीयोत ‘प्यार तो होना ही था’ मधली काही दृष्ये झळकत असून मागे या चित्रपटातले गाणे सुरू आहे. ट्विटरवरचा हा व्हिडीयो चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या चित्रपटादरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या अजय आणि काजोलने 24 फेब्रुवारी 1999 साली सात फेरे घेतले होते. लग्नानंतर देखील ते अनेकदा चित्रपटांत एकत्र झळकले आहेत. गेल्याच वर्षी ‘तान्हाजी’ चित्रपटात ही जोडी झळकली होती.

आपली प्रतिक्रिया द्या