
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ आणि अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ या दोन्ही चित्रपटांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. परंतु निर्मात्यांसाठी तणावाची बाब म्हणजे दोन्ही चित्रपट एकाच तारखेला प्रदर्शित होत आहेत. अशा परिस्थितीत बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट राज्य करणार यावरून या दोन्ही चित्रपटांच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.
2024 सालचे चित्रपटाचे कॅलेंडर खूपच ठोस आहे. कारण अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यातलेच पुष्पा 2 आणि सिंघम हे दोन चित्रपट आहेत. आणि हे दोन्ही चित्रपट एकाच तारखेला म्हणजेच 15 ऑगस्टला सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित होत आहेत. रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाची घोषणा आधीच झाली होती. अल्लू अर्जुनने नंतर ‘पुष्पा 2’ ची घोषणा केली. त्यामुळे अजय देवगण थोडा नाराज झाला आहे. चित्रपटाचे निर्माते रोहित शेट्टी आणि त्यांची संपूर्ण टीमला बॉक्स ऑफिसवरील क्लॅशमुळे चित्रपटाचे कोणतेही नुकसान होऊ नये असे वाटत आहे, म्हणून ते तारीख बदलणार असल्याची शक्यता आहे.
अजयला पुष्पा2 चे नुकसान करायचे नाही
सूत्रांनी सांगितले की, पुष्पा आणि सिंघम हे दोघेही हिंदीतील ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत आणि त्यामुळे त्यांना एकाच तारखेला प्रदर्शित करता येणार नाही.म्हणून अजय देवगण आणि रोहित शेट्टीने एकत्र डेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अजय आणि रोहितला वाटते की पुष्पाला सुट्टीची गरज आहे, पण सिंघम हा इतका मोठा ब्रँड आहे की तो कोणत्याही सुट्टीशिवाय रेकॉर्ड मोडेल. त्यांना पुष्पाच्या व्यवसायाचे नुकसान करायचे नाही. अल्लू अर्जुनने अजय देवगणला फोन केला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती, असेही सूत्राने सांगितले.