‘तानाजी’वरील शाहरुखच्या ट्विटवर अजय देवगणचंही उत्तर

4531
shahrukh-khan-ajay-devgan

अजय देवगण याचा ‘तानाजी’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. नुकताच अजय देवगणने या चित्रपटातील आपला लुक शेअर केला होता. विशेष म्हणजे हा अजयच्या करिअर मधिल 100 वा बॉलीवुड चित्रपट आहे आणि या विशेष प्रसंगी शाहरुख खानने देखील ट्वीट केले आहे.

शाहरुख खानने ट्विटरवर एक स्पेशल पोस्ट शेयर केली होती. या पोस्टमध्ये शाहरुखने लिहिले होते की, ‘माझा मित्र अजय देवगण 100 आणि त्याहून अधिक चित्रपटात भूमिका करताना दिसेल. तुझ्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरणाऱ्या या घटनेबद्दल तुझे अभिनंदन. दोन मोटरसायकलवर स्वार होण्यापासून तुझी ही सफर सुरू झाली. तू एक मोठा रस्ता कापला आहे. ‘तानाजी’ चित्रपसाठी गुड लक’.

शाहरुखच्या मेसेजला अजयने रिप्लाई देखील दिला आहे. त्यानी लिहिलं आहे की, ‘शाहरुख माझ्या 100व्या चित्रपटाला इतकं विशेष स्थान दिल्याबद्दल शुभेच्छा. तुझ्या या शुभेच्छांचं खूप कौतुक वाटतं आहे’.

अजय आणि त्याची पत्नी अभिनेत्री काजोलनं देखील ही पोस्ट शेअर केली होती. या मध्ये तीनं म्हटलं होतं की 30 वर्ष आणि 100 चित्रपटांनंतर… फूल और कांटे पासून गोलमाल, शिवाय आणि तानाजी पर्यंत. जेवढे शुक्रवार तू आपल्या मेहनतीने जिंकले आहेस त्या सर्व भूमिका तुझ्याकडे येतात. तुझ्या चित्रपटच्या 100 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आपली प्रतिक्रिया द्या