अजय देवगणच्या ‘मैदान’ सिनेमाचे पोस्टर लाँच  

1750

अजय देवगणच्या ‘तानाजी’ सिनेमाने नुकताच 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रचंड हिट झालेल्या ‘तानाजी’ सिनेमानंतर अजयचा आणखी एक नवा सिनेमा येतोय. या नव्या सिनेमाचे नाव ‘मैदान’ असून, अजयनं त्याचं टीझर पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

अजय देवगणच्या ‘मैदान’ या सिनेमाच्या या पोस्टरमध्ये चिखलमय असलेल्या मैदानात हाफ पँट्स घातलेले काही फुटबॉलपटू दिसत आहे. मात्र या पोस्टरमध्ये एकाचाही चेहरा दिसत नाही. हा सिनेमा हिंदुस्थानी फुटबॉलच्या सुवर्ण इतिहासावर आधारित आहे. वृत्तानुसार, अजय देवगण या सिनेमात फुटबॉल कोच सैयद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारणार आहे. सैयद अब्दुल हे 1950 ते 1963 पर्यंत हिंदुस्थानच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे कोच आणि मॅनेजर होते. रहीम यांचे निधन 1963 साली झाले. त्यांच्या नेतृत्वात हिंदुस्थानी फुटबॉल संघ 1956 साली ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता.

बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणावा जॉय सेनगुप्ता हे सिनेमाचे निर्माते आहेत. तर अमित रविंद्रनाथ शर्मा हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहे. हा सिनेमा 27 नोव्हेंबर 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या