रामदेव बाबांवर मालिका येणार, अजय देवगण करणार दिग्दर्शन

51

सामना ऑनलाईन, मुंबई

योगगुरू बाबा रामदेव बाबा त्यांच्या योगामुळे आणि पतंजलीच्या उत्पादनांमुळे इतके प्रसिद्ध झालेत की आता त्यांच्यावर एक टीव्ही मालिका काढण्यात येणार आहे. ‘स्वामी बाबा रामदेव,द अनटोल्ड स्टोरी’ या नावाने ही मालिका काढण्यात येणार असून, या मालिकेच्या केंद्रस्थानी बाबा रामदेव आणि त्यांचा सहकारी बालकृष्ण दाखवण्यात येणार आहे. एक सामान्य माणूस ते जगप्रसिद्ध योगगुरू होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास या मालिकेत दाखवण्यात येणार आहे.
ajay-devgan
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेचे लेखक कथेसंदर्भात संशोधन आणि अभ्यास करत असून ते पूर्ण झाल्यानंतर  या वर्षाच्या अखेरपर्यंत मालिकेचे चित्रीकरण  सुरू होण्याची शक्यता आहे. हरियाणातील २५ डिसेंबर १९६५ रोजी जन्मलेल्या रामकृष्ण यादव यांनी संस्कृत,वेद आणि योगाचं शिक्षण घ्यायला लहान वयातच सुरूवात केली होती.  त्यांनी स्वामी शंकर देव यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांचं नाव बाबा रामदेव असं झालं. जन्मापासून जगप्रसिद्ध व्यक्ती होण्यापर्यंत त्यांचा प्रवास मालिकेत उतरवणं हे कठीण असून हे आव्हान अजय देवगण याने दिग्दर्शक म्हणून स्वीकारलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या