सलमान खानवर अजय देवगण नाराज

62

सामना ऑनलाईन । मुंबई

‘साराग्रहीच्या लढाई’वर निर्माता करण जोहर आणि सलमान खानने चित्रपटाची घोषणा केली व तेव्हापासून बॉलिवूडमध्ये एक वेगळीच लढाई सुरु झाली आहे. ‘साराग्रहीच्या लढाई’वर बॉलिवूडमध्ये अजय देवगण, राजकुमार संतोषी व सलमान खान असे तिघही चित्रपट बनवत आहेत. त्यामुळे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढाईला आता एक भावनिक वळण मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांचे चांगले मित्र असलेले अजय देवगण व सलमान खान यांची मैत्री या चित्रपटामुळे तुटेल असे वाटत असतानाच अजयने सलमानला एक भावनिक मेसेज पाठवला आहे.

‘सन्स ऑफ सरदार – द बॅटल ऑफ साराग्रही’ या चित्रपटावर अजय गेली दोन वर्षे काम करत आहे. हा त्याचा महत्वाकांक्षी चित्रपट असून हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरावा म्हणून तो खूप मेहनत घेत आहे. सलमानने साराग्रहीच्या लढाईवर चित्रपट काढणार असल्याची घोषणा केली. त्यावेळी सुरवातीला अजयचा त्यावर विश्वासच बसत नव्हता. नंतर मात्र तो खूप नाराज झाला व त्याने सलमानला एक भावनिक मेसेज पाठवला.’ असे अजयच्या जवळील सूत्रांनी सांगितले.
‘सलमान तु मला कधी अशाप्रकारे दुखावशील असे वाटले नव्हते. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. त्यामुळे प्लीज शक्य असल्यास साराठाहीवर चित्रपट काढू नकोस.’ असे आवाहन त्या मेसेजमधून अजयने सलमानला केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या