तिसऱ्या आठवड्यातही बॉक्सऑफिसवर ‘तान्हाजी’चा धुमाकूळ, कमावले एवढे कोटी

5947
tanhaji

छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहांमध्ये तुफान गर्दी खेचत आहे. पहिल्या आठवड्यातच 100 कोटींचा गल्ला जमवणारा हा चित्रपट आता 250 कोटींकडे वेगाने वाटचाल करत आहे. अंगावर रोमांच उभा करणारा हा चित्रपट पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढत असल्याने कमाईचा आकडाही फुगत आहे.

‘तान्हाजी’ पाहण्यासाठी तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख चित्रपटगृहात, अजय देवगण भावूक

नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणारा अजय देवगणचा ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या आठवड्यातही घोडदौड कायम आहे. तान्हाजी चित्रपटाने आतापर्यंत 224.93 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाने शुक्रवारी 5.38 कोटी, शनिवारी 9.52 कोटी आणि रविवारी 12.58 कोटी रुपयांची कमाई केली.

अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या चिपटाने ‘पीके’, ‘टायगर झिंदा है’ या चित्रपटांचा विक्रमही मोडला आहे. तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये आता ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा समावेश झाला आहे.

‘तान्हाजी’ चित्रपटामध्ये दाखवलेला इतिहास चुकीचा! – सैफ अली खान

तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला’ बाहुबली-2′ या चित्रपटाने 17.75 कोटी, ‘दंगल’ने 14.33 कोटी कमावले होते. यानंतर आता ‘तान्हाजी’ या चित्रपटाचा नंबर लागला असून रविवारी या चित्रपटाने 12.58 कोटींचा गल्ला जमवला. ‘पीके’ या चित्रपटाने 11.58 कोटी, तर ‘टायगर झिंदा है’ या चित्रपटाने 8.27 कोटी कमावले होते.

आपली प्रतिक्रिया द्या