संबंधम… रीटेलर्ससाठी विविध लाभांसहित अनोखी डिजिटल सेवा

sambandam

खास दसरा आणि दिवाळीसाठी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन ट्रेड शोमुळे रीटेलर्सना त्यांच्या घरातून किंवा दुकानातून सुरक्षितपणे उत्सवकाळासाठी उत्पादने मिळवता येतील. एजिओ बिझनेसने आज संबंधम या त्यांच्या वार्षिक भव्य ट्रेड शोची घोषणा केली. यंदा 14-16 ऑक्टोबर 2020 या काळात आयोजितकरण्यात आलेला हा शो हिंदुस्थानात अनोख्या डिजिटल स्वरुपात सादर होईल. 16 ऑक्टोबर रोजी संपणाऱ्या या ऑनलाइन शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये रीटेलर्सना आगामी उत्सव काळासाठी सगळा माल मिळवता येईल तेही कोणत्याही वर्दळीच्या बाजारपेठांमध्ये न जाता. गर्दीच्या ठिकाणी जाणे ही सध्याची कोविड-19 ची परिस्थिती पाहता आरोग्यासाठी धोक्याची बाब ठरू शकते.

उत्सवांसाठीचे कपडे आणि फुटवेअरसोबतच संबंधममध्ये अनेक पारंपरिक उत्पादनांचे खास कलेक्शन उपलब्ध असेल. यात काचांच्या तुकड्यांची सजावट असलेले भरतकामाचे लेहंगा चोली, टसर (आसाम), कांचीपुरम, पोचमपल्ली आणि मैसूर अशा विविध प्रकारच्या सिल्क साड्या, धोती स्टाईल बॉटम्ससोबत कुर्ते, शेरवानी, कोल्हापुरी चपला अशी बहुविध उत्पादने आहेत. 1500 हून अधिक ब्रँड्सच्या एक लाखांहून अधिक स्टाईल्स इथे ऑनलाइन कॅटलॉगच्या माध्यमातून पाहता येतील. रीटेलर्सना डिझाइन, दर्जा आणि किमती याबाबत विक्रेत्यांशी व्हिडीओ कॉल्स आणि मॅसेजेसच्या माध्यमातून वाटाघाटी आणि चर्चा करता येईल. शिवाय, त्यांना व्यवसाय, ट्रेंड्स, स्टाईल्स आणि प्रोडक्ट सोर्सिंग संदर्भात तज्ञांची मतेही कळू शकतील.

इतकेच नाही, या उत्सवात भारतातील पहिला डिजिटल रँप शो होणार आहे. यात भारतातील आघाडीच्या 20 ब्रँड्सतर्फे कपडे आणि फूटवेअरमधील नवे कलेक्शन सादर केले जाईल. रीटेलर्सना थेट रँप शोमधील कपडे आणि फूटवेअरची ऑर्डर देता येईल. शिवाय, कार, बाईक, टीव्ही, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव्ह ओव्हन, किचनवेअर, वॉटर हीटर, टॅबलेट अशा अनेक भेटवस्तू आणि लाभ मिळवण्याची संधीही रीटेलर्सना आहे.

याचसोबत, संबंधममध्ये व्हर्च्युअल बिझनेस मीट आयोजित करण्यात येणार आहे. यात रीटेलर्सना अॅजिओ व्यासपीठावरील सुंदर खरेदी अनुभवासोबतच अॅजिओ बिझनेस प्रमुखांशी संवाद साधून मार्केट ट्रेंड्स आणि व्यवसाय संधींसंदर्भात चर्चा करता येईल.

कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करून आपला व्यवसाय विकसित करण्याची आणि वाढवण्याची संधी संबंधममुळे भारतातील लाखो रीटेलर्सना मिळत आहे. संबंधममध्ये सहभागी होण्यासाठी https://register.ajiosambandam.com/ इथे लॉग ऑन करा आणि या कार्यक्रमासाठीची नोंदणी करा. नोंदणीनंतर रीटेलर्सना आघाडीच्या ब्रँड्सतर्फे आकर्षक सवलतींचा लाभ घेता येईल तसेच या पोर्टलवर येऊन रीवॉर्ड पॉईंट्स मिळवता येतील.

आपली प्रतिक्रिया द्या