अजित डोवल तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी, पंतप्रधानांच्या मुख्य सचिवपदी पी. के. मिश्रांची पुन्हा नियुक्ती

ajit-doval-modi

माजी आयपीएस अधिकारी अजित डोवल यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव म्हणून पी. के. मिश्रा यांचीही पुन्हा नियुक्ती केली गेली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने अजित डोवल आणि पी. के. मिश्रा यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळासह किंवा पुढील आदेश येईपर्यंत अजित डोवल यांची नियुक्ती असेल, असे आदेशात म्हटले आहे. अजित डोवल यांची तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे. आदेशानुसार 10 जूनपासून त्यांची टर्म सुरू झाली आहे. आदेशानुसार डोवल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

अजित डोवल यांच्यासोबतच निवृत्त आयएएस अधिकारी पी. के. मिश्रा यांची पंतप्रधानांच्या मुख्य सचिवपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत त्यांची नियुक्ती कायम असेल, असे त्यांच्या नियुक्तीच्या आदेशात म्हटले आहे. पी. के. मिश्रा यांची नियुक्ती 10 जूनपासून करण्यात आली आहे.