लोक तुम्हालाही आमच्यासारखेच घरी पाठवतील!

सामना प्रतिनिधी। नागपूर

भाजपच्या शेतकरीकिरोधी धोरणामुळे भाजपचेच आमदार-खासदार नाराज आहेत. नाना पटोले यांनी राजीनामा दिला तर आशीष देशमुख यांनीही नाराजीचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. हे असेच सुरू राहिले तर बाहेरून आलेले सगळे निघून जातील आणि भाजपमध्ये फक्त जुने जनसंघवाले आणि रा. स्व. संघाला मानणारेच शिल्लक राहतील. लोकांची सहनशीलता संपली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने गांभीर्याने घेतले नाही तर तीन वर्षांपूर्वी लोकांनी आम्हाला घरी पाठवले तसे ते तुम्हालाही घरी पाठवतील, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

सभागृहाचे कामकाज सुरू होताच सलग तिसऱ्या दिवशी शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला. स्थगन प्रस्तावावर चर्चेची मागणी फेटाळल्याने वेलमध्ये येऊन विरोधी आमदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे तीनदा सभागृह तहकूब करावे लागले. त्यातच बोंडअळीच्या लक्षवेधीवर मंत्र्यांकडे माहिती उललब्ध नसल्याने ती लक्षवेधी पुढे ढकलण्यात आली. बोंडअळीविषयीचे उत्तर उद्या दिले जाईल असे सांगून अध्यक्षच अडचणीत आले असता मुख्यमंत्र्यांनी बोंडअळीच्या प्रश्नावर २९३ च्या शेतकरी प्रश्नात अंतर्भूत करून त्यावेळी दिल्या जाणाऱ्या उत्तरासोबत उत्तर दिले जाईल असे स्पष्टीकरण दिले. या प्रस्तावावर बोलताना अजित पवार यांनी इशारा दिला.

– ऑक्टोबरमध्ये कर्जमाफी झाल्याचे सरकार सांगते, मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्याकर कर्जमाफीचे पैसे जमा झालेले नाहीत. फक्त जाहिराती करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सरकार करतेय, असा आरोप अजित पवारांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या