अजितदादा, शिवेंद्रराजे यांची बारामतीत बंद खोलीत चर्चा

ajit-pawar-deputy-cm

गेल्या विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर भाजपवासी झालेले साताऱयाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आज बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार व शिवेंद्रराजे यांच्यामध्ये बंद खोलीत चर्चा झाली. यावेळी कोणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता.

पवार यांच्या साताऱयाच्या दौऱयावेळी यापूर्वी त्यांनी भेट घेतली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या बैठकीतून बाहेर पडताना शिवेंद्रराजे म्हणाले, माझ्या मतदारसंघातील विकासकामांविषयी चर्चेसाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्या भेटीला आलो होता. त्याबाबत चर्चा झाली.

आमदार शिवेंद्रराजे हे त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसंबंधी माझ्याकडे आले होते. त्यासंबंधी त्यांची व माझी बारामतीत चर्चा झाल्याचे अजित पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या