वादग्रस्त वक्तव्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार प्रसिद्ध आहेत. त्यावरून त्यांच्यावर अनेकदा टीकेची झोड उठविली जाते. आज पुन्हा बोलताना तळेगाव दाभाडे येथील सभेत त्यांची जीभ घसरली. मुले देवाच्या कृपेने नव्हे, तर चक्याच्या कृपेने होतात, असे सांगतानाच जाती-धर्माच्या महिलांनी दोन अपत्यावरच थांबण्याचा सल्ला त्यांनी दिला.
अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेत बोलताना अजित पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री पवार यांनी वाढत्या लोकसंख्येवर भाष्य करताना अल्ला किंवा देवाच्या कृपेने मूल होत नाही, तर नवऱ्याच्या कृपेने मुलेबाळे होतात, त्यामुळे दोनवरच थांबा. त्यांच्या वक्तव्यानंतर एकच हशा पिकला. लहान कुटुंब ठेवले तर या योजनांचा फायदा तुम्हाला अधिक होईल. या दोन मुलांचे चांगले संगोपन करता येईल. तसेच चांगले शिक्षण देता येईल.
तुम्हाला पण चांगले जीवन जगता येईल, असेही पवार म्हणाले. पुढे पवार म्हणाले, अलीकडे गुप्तचर विभागाने मला एक निरोप पाठविला. माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. परंतु, मी महाराष्ट्रात फिरत राहणार, जीवाला धोका आहे की नाही याचा मी विचार करत नाही. पोलिसांनी त्याची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले
बारामतीतून लढण्यास मला इंटरेस्ट नाही
आतापर्यंत मी बारामतीतून सात ते आठ वेळा निवडणूक लढवली असल्याने मला आता तिथून लढण्यास फार रस नाही. जय पवार यांना उमेदवारी देण्याकडे जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा कल असेल, तर पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून तोही विचार केला जाईल, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून आपले धाकटे पुत्र जय पवार यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. अजित पवार यांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.