बंडखोरांबाबत अजित पवारांचे मोठे विधान, काय म्हणाले वाचा सविस्तर

5604
ajit-pawar

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बुधवारी पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला सगळे आमदार उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होती मात्र काँग्रेस नेते दिल्लीवरून उशिरा आल्याने त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीचा तपशील मंगळवारी देता आला नव्हता. हा तपशील देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना आज पुन्हा दक्षिण मुंबईतील वाय.बी.चव्हाण सेंटर इथे बोलावण्यात आले आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. भाजपचे खासदार नारायण राणे लवकरच भाजप बहुमत जमवून सत्ता स्थापन करेल असे विधान केले होते. याबाबत बोलत असताना अजित पवार यांनी बंडखोरीचा विचार करणाऱ्या सगळ्याच पक्षाच्या आमदारांना इशारा दिला आहे.

अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना आता कोणत्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही असे म्हटले आहे. तरीही जर कोणी बंडखोरी केली आणि आमदार फुटला तर राज्यात 4 पक्ष आहेत. ज्या पक्षाचा आमदार फुटेल त्याच्या विरोधात चारपैकी तीन पक्ष एकत्र येतील आणि जर हे पक्ष एकत्र आले तर एकत्र आले तर ‘कोणी माई का लाल निवडून येत नाही’ असे अजित पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या