शिवसेनेला न्याय मिळाला! – विरोधी पक्षनेते अजित पवार

शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर विरोधी पक्षानेते अजित पवार यांनी शिवसेनेला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया देत समाधान व्यक्त केले.

बीकेसीची जागा शिंदे गटाला देण्यात आली आहे. तर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याच्या परंपरेसाठी शिवसेना आग्रही होती. आता न्यायालयाने निर्णय दिला असून शिवसेनेला न्याय मिळाला आहे. त्याबद्दल मनापासून समाधान व्यक्त करतो. निरपेक्ष पद्धतीने हा न्याय मिळाला असून यामुळे शिवसैनिकांमध्ये नक्कीत उत्साह संचारला असेल, असे अजित पवार म्हणाले.

शिवसेनेची विजयादशमी! दसरा मेळावा शिवतीर्थावरच; उच्च न्यायालयाने शिंदे गट आणि पालिकेची याचिका फेटाळली

गमतीने बोललो!

पुणे शहर कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी सरकार असताना गृहमंत्रीपद मागितले होते. मात्र, वरिष्ठांनी आपल्याला गृहमंत्री पद दिले नाही, असे सांगत त्यावर मिश्कील भाष्य केले. यावरून राजकारण सुरू झाल्यानंतर अजित पवार यांनी मी ते गमतीनो बोललो असे म्हटले. लोकं थकतात, रेंगाळतात तेव्हा बदल म्हणून मी बोललो होतो. तसेच वरिष्ठांनी कुठले खाते कुणाला द्यावे हा पक्षांतर्गत निर्णय होता असेही ते म्हणाले.