संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्म्यांना अजित पवार यांचे अभिवादन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन केले आहे. महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्रवीरांच्या त्यागाचे त्यांनी स्मरण केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्मा महाराष्ट्रवीरांना महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिनानिमित्त आपण भावपूर्ण वंदन करतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ”संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात योगदान दिलेल्या सर्वांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झालं पाहिजे, ही सर्व महाराष्ट्रप्रेमींची इच्छा होती. राज्यातील जनतेनं एकजुटीनं, प्राणपणानं लढून ती इच्छा पूर्ण केली. संयुक्त महाराष्ट्राचा लढा महाराष्ट्राचा गौरवशाली, प्रेरणादायी इतिहास असून सीमाभागातील मराठीभाषक गावांसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यातून बळ मिळेल. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्मा वीरांना विनम्र अभिवादन,” अशा शब्दांत अजित पवार यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या