अजित पवार नाराज? दिल्लीतील बैठकीला गैरहजर असल्याने चर्चेला उधाण

85

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

sharad-pawar-and-tariq-anwa
दिल्लीतील बैठकीसाठी शरद पवार यांच्यासोबत तारीक अन्वरदेखील उपस्थित आहेत

या बैठकीला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार अजित पवार गैरहजर आहेत. अजित पवार बैठकीला असल्याने उपस्थितांमध्ये त्यांच्या गैरहजेरीबाबत चर्चा सुरू झाली आहे.

sharad-pawar-in-national-me
दिल्लीतील बैठकीची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली

पक्षातील गटबाजीमुळे अजत पवार हे नाराज आहेत असं काहींचं म्हणणं आहे. या नाराजीमुळेच त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचं सांगण्यात येत आहे. अजित पवार हे बैठकीतील गैरहजेरीमुळे होणाऱ्या चर्चा लक्षात घेता विदेशात गेले असल्याचंही काहींचं म्हणणं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या