वाडेकर जिंकले, गावसकर हरले.. रंगला फ्रेण्डशीप कप

13

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईच नव्हे, तर हिंदुस्थानी क्रिकेटची नर्सरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी पार्क व दादर युनियन या दोन क्लबमधील चुरस… खुन्नस… अन् फ्रेण्डशिप तब्बल ३ वर्षानंतर दादर येथील शिवाजी पार्क मैदानात शनिवारी अनुभवायला मिळाली. निमित्त होते शिवाजी पार्क जिमखान्याच्या (एसपीजी) वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘फ्रेण्डशिप’ कपचे.

याप्रसंगी ८५ वर्षीय माधव आपटे, ७६ वर्षीय अजित वाडेकर यांची फलंदाजी, सुनील गावसकरांची उपस्थिती आणि संजय मांजरेकर, प्रवीण अमरे यांच्यासह इतर क्रिकेटपटूंच्या खेळाने उपस्थित क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले. वाडेकर यांच्या एसपीजीने गावसकरांच्या दादर युनियनवर चार धावांनी विजय मिळवला. यावेळी माधव गोठोसकर, माधव आपटे, वासू परांजपे, विसू लेले, अजित वाडेकर, सुनील गावसकर, पद्माकर शिवलकर, विलास गोडबोले, प्रवीण अमरे यांनी पार्कातील क्रिकेटच्या आठवणींना उजाळा दिला.

आपली प्रतिक्रिया द्या