मुकेश अंबानी पुन्हा ‘आजोबा’ झाले; आकाश आणि श्लोकाला कन्यारत्नाचा लाभ

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे पुन्हा एकदा आजोबा झाले आहेत. मुकेश यांचा मुलगा आकाश आणि सून श्लोका यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. या जोडप्याला अजून एक मुलगा असून त्याचं नाव पृथ्वी असं आहे.

काही दिवसांपूर्वीच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनावेळी श्लोका गरोदर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर तिच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रमही पार पडला होता. बुधवारी 31 मे रोजी श्लोकाने मुलीला जन्म दिला. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी श्लोका, आकाश आणि नातू पृथ्वीसह सिद्धीविनायकाच्या दर्शनाला आले होते.