अकबर दहशतवादी होता…. राजस्थानच्या शिक्षणमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

24

सामना ऑनलाईन। जयपूर

अकबर दहशतवादी होता असे वादग्रस्त वक्तव्य राजस्थानचे शिक्षणमंत्री वासुदेव देवनानी यांनी केले .पण या वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ उडाल्यानंतर  देवनानी यांनी आपण अकबरला दहशतवादी नाही तर आक्रमण करणारा म्हटले होते असे सांगत सारवासारव  केली आहे.

यापूर्वी अकबराच्या नावापुढे महान ही उपाधी लावण्यावरही त्यांनी आक्षेप घेतला होता. अकबर किल्ल्याचे नाव बदलून अजमेर किल्ला ठेवावे असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांना धमकीची पत्रेही आली होती. पण माझा दृष्टीकोन राष्ट्रवादी असल्यानेच मला धमकी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. यावरुन अनेकांनी देवनानी यांच्यावर टीका केली होती.

याविषयी मिडियाशी बोलताना देवनानी यांनी अकबर दहशतवादी असल्याचे म्हटले. पण नंतर मात्र सारवासारव करत आपण अकबरला आक्रमण करणारा म्हटल्याचे त्यांनी सांगितले आहे.तसेच मला अकबरला दहशतवादी नाही तर हल्लेखोर म्हणायचे होते. अकबराने हिंदुस्थानवर आक्रमण केले होते. यामुळेच पाठ्यपुस्तकातील अकबराचा महान हा उल्लेख वगळण्यात आल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच हळदीघाटातील लढाई महाराणा प्रताप यांनीच जिंकली होती असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या