सुपर ब्लू मूनप्रमाणे अच्छे दिनलाही १५० वर्ष लागणार का?

39

सामना ऑनलाईन । लखनौ

संपूर्ण जगभरात बुधवारी आकाशात एक दुर्मीळ असा क्षण दिसणार आहे. आशिया खंडामध्ये खग्रास चंद्रग्रहण तीन रंगामध्ये दिसणार आहे. तब्बल ३५ वर्षांनंतर खग्रास चंद्रग्रहणाचा योग आला आहे. यानंतर १५० वर्षांनी पुन्हा असा योग जुळून येईल. वर्षाच्या प्रारंभीच हा योग जुळून आल्याने ट्विटरवर #BlueMoon चा ट्रेंड सुरू आहे. या दुर्मीळ क्षणांचा ‘योग’ साधत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्वीट करत भाजपची कळ काढली आहे.

अखिलेश यादव यांनी ट्विटरवर #BlueMoon हा हॅशटॅग वापरत भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘सुपर ब्लू मूनचा योग तर जुळून आला आहे, आता अच्छे दिन कधी येणार? अच्छे दिन येण्यासाठी आणखी १५० वर्ष वाट पाहावी लागणारी का? असा सवाल अखिलेश यादव यांनी ट्विटरवरून उपस्थित केला आहे.

२०१४मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने ‘अच्छे दिन’ या टॅगलाईनचा वापर करत सत्ता मिळवली होती. मात्र तीन वर्ष सत्ता भोगल्यानंतरही विरोधी पक्षांकडून भाजपच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडवली जात आहे. महागाई, नोटाबंदी, जीएसटीमुळे नागरिकांचा हिरमोड झाल्याचं विरोधकांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या