अकलूज ग्रामपंचायतीने मंजूर केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ठराव

9

सामना ऑनलाईन, अकलूज

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था प्रचंड बिकट झाली आहे. डोक्यावर असलेल्या कर्जामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झालेल्या नसून त्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. जिल्हा बँकांमध्ये तसंच खाजगी बँकांमध्ये रोकड नसल्याचं कारण सांगत शेतकऱ्यांच्या हक्काची रक्कम त्यांना नाकारली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज अकलून ग्रामपंचायतीमध्ये शेतकऱ्याचं कर्ज माफ झालंच पाहीजे असा ठराव आणण्यात आला आणि तो मंजूरही करण्यात आला.

शिवसेनेने तर मागणी केली आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी नकोय तर आता कर्जमुक्ती हवी आहे. त्यासाठी शिवसेनेने संपूर्ण राज्यात रान उठवत शेतकऱ्यांसाठी अभियान सुरू केलं आहे. याला संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांकडून उत्तम असा प्रतिसाद मिळत आहे. अकलूज ग्रामपंचायतीनेही कर्जमाफीचा ठराव मंजूर केल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चालु आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा मंगळवारी पार पडली. यामध्ये तंटामुक्त अभियान समिती गठीत करण्यासंदर्भात चर्चा आयोजित केली होती. यामध्ये पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित न राहिल्याने नागरिकांनी पोलिसांचा निषेध केला.

आपली प्रतिक्रिया द्या