अकोल्यातील कोरोना बाधितांचा आकडा 105वर

519
corona-virus-new-lates

अकोला जिल्ह्यात कोरोना विषाणूचे थैमान वाढत असून कोरोनाबाधितांच्या आकड्याने शुक्रवारी शंभरचा आकडा पार केला. शुक्रवारी आणखी दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 105 झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण सहा महिला (त्यात एक 12 वर्षाची मुलगी) व चार पुरुष आहेत. त्यातले आठ जण बैदपुरा येथील रहिवासी आहेत. तर एक भगतसिंह चौक माळीपूरा व अन्य एक जुने शहर येथील रहिवासी असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालावरून समोर आले आहे.

रेड झोनमध्ये समावेश असलेल्या अकोला शहरातील कोरोनाबाधितांची संख्या गत आठवड्यात झपाट्याने वाढली आहे. गुरुवारी 13 पॉझिटिव्ह रुग्ण तर शुक्रवारी आणखी दहा पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 105 झाली आहे. सद्यस्थितीत 80 जणांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या