अकोला जिल्ह्यात 3.3 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के

667
earthquake-measuring

अकोला जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी 3.3 रिक्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

अकोला जिल्ह्यापासून दक्षिणेकडे 129 किमी अंतरावर या भूकंपाची नोंद झाली, असा दुजोरा अकोला येथील हवामान विभागाचे प्रभारी अधिकारी जालिंदर साबळे यांनी दिला आहे. तसेच या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्त हानी झाल्याची पुष्टी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हा भूकंप 19.5 उत्तर रेखांश व 77.1 अक्षांश पूर्व दरम्यान व पाच किमी खोलीवर जाणवला असून हे केंद्र हिंगोली जिल्ह्यात येते, असेही स्पष्ट झाले आहे. अधिक माहिती www.seismo.gov.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी घाबरू नये,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या