अकोला हिंसाचार – विलास गायकवाड हत्येप्रकरणी एकाला अटक

सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टवरून अकोला शहरात 13 मे रोजी मध्यरात्री भीषण दंगल उसळून दोन गटांत तुफान दगडफेक, हाणामारी झाली होती. संतप्त जमावाने वाहनांची जाळपोळ केली होती. या हिंसाचारात विलास गायकवाड नावाच्या माणसाचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टवरून 13 मे रोजी अकोल्यात भीषण दंगल झाली. दुपारपासून तणावग्रस्त वातावरणात मध्यरात्री झालेल्या दोन गटात तुफान हाणामारीची भर पडली. त्यावेळी झालेल्या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले. संतप्त जमावाने वाहनांची जाळपोळ करीत काही घरांना आग लावली. यामुळे वातावरण अधिक चिघळले होते.

या हिंसाचारात विलास गायकवाड नावाच्या एका इलेक्ट्रिशियनचा मृत्यू झाला होता. घरातला एकमेव कमावता असलेला विलास 13 मे रोजी कामावरून घरी परतत असताना त्याच्यावर हल्ला झाला होता. त्याच्यावर दगड आणि पाईपने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर हल्ला करण्याचा संशय असलेल्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.