अक्षयने मानले चाहत्यांचे आभार

42

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेता अक्षय कुमार याने त्याला मिळालेल्या पुरस्कारासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या ६४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अक्षयला रुस्तम या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

या पुरस्कारासाठी चाहत्यांचे आभार मानताना धन्यवाद हा शब्द अपुरा असल्याचं अक्षयने म्हटलं आहे. रुस्तम हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे. माझे चाहते, हितचिंतक आणि विशेषतः माझे आईवडिल आणि पत्नी यांचे आभार मानतो, असं अक्षय म्हणाला.

पाहा अक्षयचं हे ट्विट-

आपली प्रतिक्रिया द्या