2020 मध्ये अक्कीचे हे सुपर बजेट चित्रपट होणार प्रदर्शित

1320

बॉलिवूड मधील खिलाडी म्हणून ओळखला जाणाऱ्या अक्षय कुमारचे 2020 या आगामी वर्षात एक नव्हे तर तब्बल चार चित्रपट येऊ घातले आहेत. आमिर खान एक स्क्रिप्ट वाचण्यात जेवढा वेळ घालवतो तेवढ्या वेळात अक्षय कुमारचे चार चित्रपट येऊन जातात असे मस्करीत म्हटले जाते. अक्षय कुमार हा असा एक अभिनेता आहे ज्याच्या एका चित्रपट प्रदर्शित होताच त्याच्या दुसऱ्या चित्रपटाची चर्चा ही सुरू झालेली असते. कॉमेडी असो, अॅक्शन असो किंवा सामाजिक विषयावर आधारित चित्रपट असो. अक्की आपली भुमिका चांगलीच वठवतो. 2020 मध्ये अक्षयचे चार चित्रपट येणार आहेत. या सर्व चित्रपटांचा बजेट मिळून तब्बल 500 कोटींच्या आसपास आहे. तसेच 2021 मध्ये प्रदर्शित बेल बॉटम हा गुप्तहेरावर आधारित चित्रपटही प्रदर्शित होणार आहे.

akshay-kumar-2

रोहित शेट्टी दिगदर्शित ‘सूर्यवंशी’ चित्रपट हा 27 मार्च 2020 ला प्रदर्शित होणार आहे. सिम्बा या चित्रपटात रोहितने या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचा बजेट 80 कोटीहून अधिक आहे.  या चित्रपटात अक्षय कुमार सोबत कतरिना कैफही दिसणार आहे. चित्रपटातील एक व्हिडीओही व्हायरल होत आहे.

suryavanshi-movie

कियारा अडवाणी आणि अक्षय कुमार हे प्रथमच एका हॉरर चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. तेलुगू चित्रपटाचे दिगदर्शक राघव लॉरेन्स ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट 2020 च्या ईदला प्रदर्शित करणार असून या चित्रपटाचा बजेट जवळजवळ 105 कोटी इतका आहे.

lakshmi-bomb

2020 मधील दिवाळीच्या मुहुर्तावर अक्षयचा पृथ्वीराज हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत माजी विश्वसुंदरी मानुषी छिल्लरही झळकणार आहे. या चित्रपटाचा बजेटही ३०० कोटी इतकी आहे.

prithviraj-movie

2020 च्या ख्रिसमस निमित्ताने अक्कीचा बच्चन पांडे हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ख्रिसमसहा आमिर खानचा ठरलेला मुहुर्त. आमिर खानचा या दिवशी लाल सिंग चढ्ढा हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. या दिवशी या दोन्ही सुपरस्टारचे क्लॅश होणार असे म्हटले जाते. बच्चन पांडे चित्रपटात अक्षय कुमारसोबत क्रिती सॅनन ही सुद्धा झळकणार आहे.

bachachn-pandey

बहुचर्चित हेरा फेरी 3 हा चित्रपटही 2020 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आहे की नाही याबाबत अजून अधिकृतरित्या माहिती मिळालेली नाही.

hera-pheri-3

आपली प्रतिक्रिया द्या