तृतीयपंथीयांसाठी अक्षय कुमारची दीड कोटींची मदत

991

अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या दानशूर स्वभावासाठी ओळखला जातो. कधी शेतकऱ्यांना मदत तर कधी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना त्याने मदत केल्याचे ऐकले असेल. यावेळेस मात्र अक्षयने समाजात दुर्लक्षित राहिलेल्या तृतीयपथीयांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

laxmi-bomb-movie

लक्ष्मी बॉम्बचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स हे तृतीयपंथीयांसाठी एक इमारत बांधणार असून त्यासाठी ते फंड गोळा करत आहेत. त्या फंडला अक्षय कुमारने दीड कोटींची मदत केली आहे. राधव लॉरेन्स यांनी स्वत: सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. ‘आम्ही लक्ष्मी बॉम्बचे शूटींग करत असताना मी माझ्या या प्रोजेक्टविषयी अक्षय कुमारला सांगितले. त्यानंतर त्यांनी लगेचच मी या प्रोजेक्टला दीड कोटी देत असल्याचे सांगितले. अक्षय सर हे अगदी देवासारखे आमच्यासाठी धावून आले आहेत. मी या पाठिंब्यासाठी त्यांचे सर्व तृतीयपंथीयांकडून आभार मानतो. आम्ही लवकरच आमच्या प्रोजेक्टचे भूमीपूजन करू ‘,असे राघव लॉरेन्स यांनी सांगितले.

राघव लॉरेन्स दिग्दर्शित ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटामध्ये अक्षय कुमार हा एका तृतीयपंथीयाच्या भूताच्या भूमिकेत दिसणार आहे. गुलाबी रंगाची साडी, कपाळावर भलंमोठं गोल कुंकू, गळ्यामध्ये मोठे लॉकेट आणि हातामध्ये गुलाबी रंगाच्या बांगड्या भरलेल्या लूकमध्ये अक्षय या चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये दिसला. गेल्या वर्षी देशभरामध्ये नवरात्रीचा उत्सव सुरू असतानाच अक्षयने ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला होता. ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटामध्ये अक्षयसोबतच तुषार कपूर, शरद केळकर आणि कियारा अडवाणी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट यावर्षी ईदच्या दिवशी रिलीज होण्याची शक्यता आहे.

साडी काम करताना आली मजा 

‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटात त्याने साडी नेसली आहे. अक्षय कुमार याने साडीत काम करताना त्याला बिलकूलच त्रास झाला नसल्याचे सांगितले आहे. उलट आपण साडीत कम्फर्टेबल होतो असे त्याने सांगितले. ”मला नेहमी आव्हान स्विकारायला आवडते. मी आतापर्यंत केलेल्या भूमिकांपैकी सर्वात कठिण भूमिका लक्ष्मीची आहे. पण मनापासून मला हे पात्र करायचं होतं. या चित्रपटात मी साडी नेसून आहे. मात्र साडीमध्ये मी जास्त कम्फर्टेबल होते. मला साडीत शूटींग करताना जराही त्रास झाला नाही. मला आवडतात अशा विचित्र गोष्टी करायला. मात्र त्या भूमिकेसाठी योग्य हावभाव चेहऱ्यावर आणने हे माझ्यासाठी कठिण होतं.’ असं अक्षय म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या