किस केले नाही म्हणून गर्लफ्रेंडने केले ब्रेकअप, अक्षयने सांगितला जुना किस्सा

अभिनेता अक्षय कुमार हा त्याच्या बॉलिवूडमधील अफेयर्समुळे कायम चर्चेत राहिला आहे. बऱ्याच सुंदर अभिनेत्रींसोबत त्याचे अफेयर होते. मात्र एकेकाळी अक्षयला अनेक मुलींनी डच्चू देखील दिलेला आहे. अक्षय कुमारने एका कार्यक्रमात त्याच्या या तरुणपणीच्या अफेयबाबत सांगितले आहे.

वर्षभरापूर्वी अक्षय त्याच्या हाऊसफुल्ल-4 या सिनेमाच्या टीमसोबत कपिल शर्मा शोमध्ये आला होता. त्यावेळी त्याने हा किस्सा सांगितला होता. ‘मी कॉलेजमध्ये असताना तीन चार मुलींना डेट केलं मात्र त्या सर्व मला सोडून गेल्या. त्यावेळी मी खूप लाजरा बुजरा होतो. तोच माझा मोठा प्रॉब्लेम होता. मला मुलींच्या खांद्यावर हात ठेवायला, त्यांचा हात पकडायला, किस करायला भिती वाटायची. एका मुलीला तर मी किस करायला नकार दिला म्हणून ती मला सोडून गेली’, असे अक्षयने एका यावेळी सांगितले होते.

अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांच्या लग्नाला गेल्या रविवारी 20 वर्ष पूर्ण झाली. त्या दोघांनीही सोशल मीडियावरून याबाबत पोस्ट शेअर केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या