अक्षय कुमारचा चाहत्यांना पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का !

43

सामना ऑनलाईन, मुंबई

अक्षय कुमारने सोशल मीडियावर संस्कृतमध्ये ग्रंथांच्या संदर्भात अध्याय वाचत असतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचं संस्कृतचं वाचन, त्याचा शांतपणे बसल्याचा अवतार हे सगळंच प्रेक्षकांसाठी नवीन आणि उत्सुकता वाढवणारं आहे. रुस्तम स्टारने तुमच्यासाठी काहीतरी इंटरेस्टिंग असल्याचं सांगत तुम्ही ते काय आहे हे ओळखू शकता का असा प्रश्नही त्याने विचारलाय. #SahiAyurveda यावर तुमचं उत्तर पाठवा असं म्हणत त्याने याचं उत्तर संस्कृतमध्ये आहे अशी हिंटही ट्विटरवरुन दिलीये. हे सगळं त्याच्या नवीन चित्रपटाचं एखादं पात्र किंवा या सुपरस्टारचं एखादं आव्हान तर नाही ना? अशी चर्चा अक्षयच्या चाहत्यांमध्ये सुरु आहे.

सध्या अक्षय कुमार त्याचा आगामी ‘टॉयलेट-एक प्रेम कथा’ या चित्रपटाच्या तयारीत आहे. भूमिका पेडणेकर आणि अनुपम खेर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्टला चित्रपटगृहात मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या