राणाला मदत करणार ‘जॉली एलएलबी’ अक्षय कुमार

सामना ऑनलाईन,मुंबई

तुझ्यात जीव रंगलामध्ये कोल्हापुरच्या लाल मातीतला रांगडा गडी राणा आणि गावातील शाळेत शिक्षिका असलेली अंजली यांची प्रेमकथा चांगलीच बहरात आली आहे. या मालिकेत अक्षय कुमार राणाची मदत करताना बघायला मिळणार आहे.

rana-and-akshay-2

अंजलीचा मित्र कल्पेश तिला आणि राणाला घेऊन एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये जातो, तिथे कल्पेश राणाची टर उडवतो त्यामुळे राणा निराश होतो असं दाखवण्यात आलं आहे. याचवेळी त्याला मदत करण्यासाठी आणि राणाला प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी जॉली एल.एल.बी चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेला अक्षय कुमार पुढे येतो. त्याच्या सल्ल्यामुळे राणाचा आत्मविश्वास वाढतो आणि तो अंजलीला आपल्या मनातील भावना सांगण्यासाठी तो तयार होतो.

rana-and-akshay-1

आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षयकुमारने या मालिकेची निवड केली. त्याचा सहभाग असलेले विशेष भाग १ आणि २ फेब्रुवारीला संध्याकाळी ७.३० वा. झी मराठीवर बघायला मिळणार आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या