थिएटरनंतर ‘बेल बॉटम’ ओटीटीवर

अभिनेता अक्षय कुमार याचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 16 सप्टेंबरपासून अॅमेझॉन प्राईमवर हा चित्रपट बघता येईल.

खरं तर अक्षय पुमार आणि वाणी कपूरचा ‘बेल बॉटम’ चित्रपट 19 ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेला आहे. लॉकडाऊननंतर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणारा ‘बेल बॉटम’हा पहिला चित्रपट ठरला. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघणे शक्य झाले नाही, त्यांच्यासाठी आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिला जात आहे.

‘बेल बॉटम’ चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये चांगली कमाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या