घाडगे अँड सूनमध्ये हवाहवासा ट्विस्ट! अक्षय अमृताला करणार अनोख्या अंदाजात प्रपोज

सामना ऑनलाईन । मुंबई

प्रेम जगातील अत्यंत सुंदर भावना आहे. कधी ते एका नजरेत होत कधी सहवासातून तर कधी मैत्रीमधून.. घाडगे अँड सूनमधल्या अक्षय आणि अमृताच म्हणालं तर जरा वेगळं आहे, त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता, अनेक अडचणी आल्या … त्यांचे नाते गैरसमजूतीतुन सुरू झालं मग मैत्री आणि मग हळूहळू अमृताला अक्षयबद्दल प्रेम वाटू लागेल पण तेव्हा तो कियारावर प्रेम करत होता… पण आता मात्र चित्र वेगळं आहे…

काही महिन्यांमध्ये अक्षय आणि अमृताच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडल्या आहेत आणि कोण खर आणि खोटं हे अक्षय आणि अमृताला कळून चुकले आहे. अक्षयला समजले आहे त्याचे खरे प्रेम अमृतावर आहे, आणि आता अमृताला आयुष्यात परत आणण्यासाठी त्याची वाटचाल सुरू झाली आहे. अक्षय अमृताला येत्या भागांमध्ये एक सुंदरसं सरप्राईज देणार आहे. अक्षय अनोख्या अंदाज मध्ये अमृताला प्रपोज करणार आहे. अक्षय आणि अमृताच्या आयुष्यात बऱ्याच दिवसांनी हे सुखाचे क्षण आले आहेत. हे क्षण दोघांसाठी सुध्दा खूप खास आहेत. अमृताच्या आयुष्यात आलेल्या प्रेमाच्या या सरी कुठलं नवं वळणं घेऊन येतील हे कळेलच.

अमृतावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी अक्षयने एका कॉफी शॉपमध्ये रोमँटिक वातावरण तयार केलं आहे … अमृताला प्रत्येक जण गुलाबाचं फुल देऊन हा दिवस तिच्यासाठी खास आहे असे सांगत आहे. पण तिला याची कल्पना नाहीये, ती या सरप्राईज पासून अनभिज्ञ आहे. अक्षय तिच्यासाठी छानसं गाणं म्हणणार असून नंतर तिला प्रपोज करणार आहे…

आता यावर अमृता काय उत्तर देणार? अमृता अक्षयला अजून एक संधी देणार का? यामध्ये कियारा कुठलं नव कारस्थान रचणार? माई अक्षयला कशी साथ देणार? अक्षय अमृताच्या घरच्यांना कसे मनवणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या