हिंदुस्थानविरोधात अल कायदाला युद्ध पुकारायचे होते!

23
लाहोर विधीमंडळ बॉम्बफेकीप्रकरणी सीआयडीने हस्तगत केलेला बॉम्ब

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

नवी दिल्लीच्या लक्ष्मीनगर भागातून गेल्या आठवडय़ात अटक करण्यात आलेल्या अल कायदाच्या सुमोन रहमान या दहशतवाद्याने अल कायदाला हिंदुस्थानविरोधात युद्ध पुकारायचे होते अशी धक्कादायक माहिती दिली आहे.  हिंदुस्थानविरोधात दहशतवादी कारवाया करण्यासाठी दिल्ली, मणीपूर आणि मिझोराममध्ये केंद्र उभारून रोहिंग्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.

म्यानमारच्या लष्कराविरोधात युद्ध पुकारून हिंदुस्थानात दहशतवादी कारवाया करण्यासाठी सीरियामध्ये जाऊन त्याने प्रशिक्षण घेतले होते. हिंदुस्थानविरोधात कारवाया कशा करायच्या, रोहिंग्यांची फौज कशी उभारायची, म्यानमारच्या लष्कराविरोधात रोहिंग्यांना कसे भडकवायचे याचे धडे त्याने सीरियात घेतले होते.

फक्त तलाकचा पश्चाताप

दहशतवादी कारवायांत सहभागी झाल्याचे कोणतेही दु:ख नाही. मात्र, पत्नीला तलाक दिल्याचा पश्चाताप होत असल्याचे रहमानने चौकशीदरम्यान सांगितले. त्याच्या पत्नीने त्याला तुरुंगातून सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. मात्र, २०१७मध्ये तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने पत्नीला तलाक दिला होता. त्याला पत्नीला भेटण्याची इच्छा आहे. मात्र, तिचा दुसऱयाशी निकाह झाल्याने तिला भेटता येत नसल्याचे तो म्हणाला. ढाक्यात तुरुंगात असताना त्याला सोडवण्यासाठी तिने प्रयत्न केले होते. तुरुंगात असतानाच २०१५मध्ये त्याचा निकाह झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या