अलकायदाचा म्होरक्या अल जवाहिरीचा तडफडून मृत्यू, अखेरच्या क्षणी मिळाले नाहीत उपचार

जगातील सर्वात मोठी दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरी याचा अफगाणिस्तानात मृत्यू झाला आहे. अरब न्यूज एजन्सी च्या सूत्रानुसार नुसार त्याचा मृत्यू दम्यामुळे झाला असून शेवटच्या क्षणी त्याला उपचार न मिळाल्याने तो तडफडून मेल्याचे समोर आले आहे. अद्याप याबाबत अल कायदाने कोणतेही अधिकृत वृत्त जाहीर केलेले नाही

मिळालेल्या माहितीनुसार जवाहीरी याचा गेल्या आठवड्यात गजनी प्रांतात मृत्यू झाला. त्याला दम्याचा त्रास होता. अखेरच्या काळात त्याला उपचार न मिळाल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यातच तडफडून त्याचा मृत्यू झाला

जवाहिरीच्या मृत्यू नंतर आता अलकायदाची कमान कोण सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ओसामा बिन लादेन याचा मुलगा हजमा बिन लादेन तसेच अल-कायदाचा प्रमुख दहशतवादी अबू मोहम्मद अलम मसरी यांचे गेल्या वर्षभरात मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे अल-कायदाचा नेतृत्वावरून वाद होण्याची शक्यता आहे

आपली प्रतिक्रिया द्या