आळंदीत राज्यातील परगावच्या अस्थी विसर्जनास बंदी, कोरोना संसर्ग रोखण्याकरिता उपाययोजना

आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रात परगावासह राज्यातून अस्थी विसर्जन व दशक्रिया विधी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाने कोविड-19 रोखण्याच्या उपाययोजनेअंतर्गत तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे हेतूने बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव व आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.

आळंदीसह सर्वत्र कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. इंद्रायणी नदी परिसरात आळंदीतील ग्रामस्थांसह अस्थी विसर्जनास येणाऱ्यांची मोठी गर्दी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत होते. . या विविध ठिकाणांहून लोक येथे एकत्र येतात. यामुळे परिसरात साथ पसरू नये यासाठी आळंदीकर नागरिक आणि भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जनास होणारी गर्दी कमी करण्याची मागणी झाल्याने प्रशासनाने राज्यातून आळंदीत अस्थी विसर्जनास बंदी घातली आहे. यामुळे आळंदीला बाहेरगावाहून कोणीही अस्थी विसर्जनास येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिक वगळता या आदेशाचे पालन पुढील आदेश मिळेपर्यंत करावे, असेही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या आदेशाचे पालन न केल्यास साथ रोग नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, आळंदी मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या