आळंदीत महिला दिनी कष्टकरी महिलांचा सन्मान; रक्तदान, अन्नदान उत्साहात

आळंदी शहर व पंचक्रोशीत महिला दिन विविध सामाजिक, आरोग्यदायी उपक्रमानसह महीलांचा सन्मान, सत्कार, अन्नदान, साडी वाटप तसेच रक्तदानाने साजरा करण्यात आला.

येथील मारुती देवस्थान ट्रस्टचे प्रांगणात आळंदी जनकल्याण फाउंडेशन संचालित मधुकरी अन्नदान वाटप तसेच महिला दिनी सेवक इंदुबाई कदम, मंगलबाई पाटील, सीताबाई ढगे या अन्नदान छत्रातील सेवक कष्टकरी महिलांचा साडी चोळी देवून सन्मान महिलांचे हस्ते करण्यात आला. यावेळी हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाचे अध्यक्ष हनुमंत देवकर यांचे हस्ते साधक वारकरी यांना अन्नदान वाटप करण्यात आले.

यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, विश्वस्त अर्जुन मेदनकर, सचिन कु-हाडे, हनुमंत महाराज खाडे, सचिन वहिले, ज्ञानेश्वर घुंडरे, दिव्य भारतीचे संजय होले, दिनकर तांबे, श्री मारुती देवस्थानचे विश्वस्त नवनाथ महाराज शिंदे, सौरभ महाराज बेलकर आदि उपस्थित होते. आळंदीत लॉकडाउन पासून अन्नदान वाटप सेवा सुरू असून लॉकडाउन नंतर आळंदी निवासी वारकरी साधक, अभ्यासक वारकरी विद्यार्थी यांचेसाठी एक वेळ जेवण मधुकरी वाटप सेवा सामाजिक बांधिलकी जोपासत अन्नदान सेवा सुरू असल्याचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर यांनी सांगितले.

येथील भारतीय स्टेट बँक शाखेत शाखाधिकारी वैजयंता शर्मा यांचे हस्ते महिला दिनानिमित्त बँकेत महिला अधिकारी, पदाधिकारी, ग्राहक यांचा सन्मान करण्यात आला. येथील नियती फाउंडेशनच्या वतीने महिलाचा सन्मान व महिला दिना निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन उत्साहत करण्यात आले. यासाठी फाउंडेशनच्या अध्यक्षा नियती शिंदे यांनी परिश्रम घेत उत्साहात महिला दिनी विविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले.

आळंदी नगरपरिषद नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी महिलांचा सन्मान करीत महिला दिनानिमित्ताने महिलाना शुभेच्छा दिल्या. महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यास आपण नेहमी प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या