बॉलिवूडची अभिनेत्री तसेच नेपोकिड म्हणवली जाणारी अनन्या पांडे हिचे चुलते चिक्की पांडे यांनी त्यांच्या मुलीला एक खोचक प्रश्न विचारला आहे. अनन्याची चुलत बहिण अलाना पांडे हिला तिच्या वडिलांनी तु टॉप घालायला विसरलीस का? असा प्रश्न विचारला आहे.
अलानाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या कुटुंबासह बसलेली दिसत आहे. तिने पिस्ता कलरचे ब्रालेट आणि पांढऱ्या रंगाचे ट्राउजर घातले आहे. तिचा हा आऊटफिट पाहून चिक्की पांडे यांनी तू टॉ घालायला विसरली आहेस का? असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून अलाना देखील आश्चर्यचकित होऊन पाहू लागली. त्यावर उभी राहून तिने घातलेले कपडे आपल्या वडिलांना दाखवले. त्यावर चिक्की पांडे यांनी तुला शर्ट घालण्याची गरज आहे असे वाटत नाही का असा पुन्हा प्रश्न केला. त्यावर अलानाने हे ब्रालेट असल्याचे सांगितले. तिच्या या उत्तरावर चिक्की पांडेनी ब्रालेट या शब्दाची फोड करत त्यावर ब्रा ही झाकलेली असायला हवी असे सांगितले.
View this post on Instagram
अलानाचा हा व्हिडीओ द ट्राइब या शोमधील आहे. या व्हिडीओमध्ये अलानाची आई देखील दिसत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असून त्यावर मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी अलानाला पाठिंबा दिला आहे तर काहिंनी चिक्की पांडेला पाठिंबा दिला आहे.
अलाना पांडेने अमेरिकेतील फोटोग्राफर आयवोर मॅक्रे याच्यासोबत लग्न केले. काही महिन्यांपूर्वीच त्यांना एक गोंडस बाळ झाले आहे. त्यांनतर आता अलानाने द ट्राइब नावाच्या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
द ट्राइब हा शो करण जोहरची निर्मिती असून यामध्ये इन्फ्लुएन्सर्सची कहाणी दाखवण्यात येणार आहे. काही इन्फ्लुएन्सर्स लॉस एंजलस मध्ये जातात आणि तिथे वेगवेगळ्या कंटेंटचे शूट कसे करतात हे दाखवले जाणार आहे. याचे भाग प्राइम व्हिडीओवर पाहायला मिळतील.