आताच बदला, नाहीतर 31 जानेवारीनंतर बंद होऊ शकते तुमचे ATM कार्ड

atm-cards

गेल्या काही महिन्यांमध्ये बँकिंग क्षेत्राला सायबर क्राईमचा मोठा फटका बसला. विविध बँकांच्या अनेक खातेधारकांना आपले पैसे यामुळे गमवावे लागले. ग्राहकांच्या असंख्य तक्रारीनंतर रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने बँकांना ATM कार्डात बदल करण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर बँकांनी खातेधारकांचे कार्ड बदलण्याची प्रक्रिया सुरू केली होती. असे असले तरी अद्याप देखील जुने कार्ड वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र अशा खातेधारकांना 31 जानेवारीनंतर मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

हिंदुस्थानच्या टपाल विभागाने आपल्या खातेधारकांना अॅलर्ट जारी केला आहे. या अॅलर्टनुसार बचत खातेधारकांनी आपला मोबाईल क्रमांक अपडेट करणे तसेच 31 जानेवारी पर्यंत जुने एटीएम कार्ड बदलून नवे ईएमव्ही चिप असलेले कार्ड घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

हिंदुस्थानच्या टपाल विभागाच्या अॅलर्टनुसार 31 जानेवारीनंतर जुने कार्ड वापरातून बाद होतील. म्हणून आपल्याकडे असे जुने कार्ड असल्यास ते त्वरित बदलून घेणे आवश्यक आहे.

यानंतर नवे कार्ड खातेधारकांना वापरण्यासाठी देण्यात येतील. जुने कार्ड बदलून नवे कार्ड घेण्यासाठी बँकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आपला मोबाईल क्रमांक देखील 31 जानेवारी पर्यंत अपडेट करण्याचे बँकेकडून जाहीर करण्यात आले आहे.

टपाल विभाग खातेधारकांना बँकांप्रमाणेच बचत खात्याची सेवा उपलब्ध करून देते. अवघ्या 500 रुपयांत इथे खाते उघडता येते. बचतीसोबतच चेक आणि एटीएमसारख्या अन्य सेवा देखील देण्यात येतात.

आपली प्रतिक्रिया द्या