पाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या अडचणीत वाढ

16

सामना ऑनलाईन । लाहोर

पाकिस्तानी अभिनेता आणि गायक अली जफरच्या अडचणीत वाढ झाली आहे. गायक मीशा शफीने अली जफरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मीशाने अलीवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर अलीनेही सोशल मीडियावरून मीशाने केलेले आरोपाचे खंडण केले होते. मात्र आता अलीवर आणखी काही महिलांनी  अशाच प्रकारचे गंभीर आरोपी केले आहेत.

मीशा शफीनंतर आता आणखी तीन महिलांनी अली जफरवर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. लीना घानी नावाच्या महिलेने सोशल मीडियावर मीशाला उद्देशून टाकलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘तुम्ही हिम्मत दाखवली आहे. मात्र तुम्ही एकट्या नाही आहात जिने हे सहन केलं आहे. अली माझ्यासोबतही तसाच वागला आहे. अनेकदा त्याने माझ्या सोबत अश्लील संभाषण केलं आहे जे मला सांगायलाही लाज वाटत आहे.’ इतर दोन महिला माहम आणि हुमानेही असेच आरोप अलीवर केले आहेत.

अली जफरने बॉलिवूडमधील सिनेमांमध्येही काम केलं आहे. ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘चश्मे बद्दूर’, ‘तेरे बिन लादेन’ आणि ‘डियर जिंदगी’ या सिनेमांमध्ये अली झळकला आहे. अलीवरील वाढत चाललेल्या आरोपांमुळे त्याच्या भोवतीचा कारवाईचा फास आवळत चालला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या