आलिया आणि रणबीरच्या मुलीचं नाव ठरलं… वाचा बातमी!

बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रेटी जोडपे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 6 नोव्हेंबर रोजी आई-बाबा झाले आणि कपूर कुटुंबात नन्ही परीचे आगमन झालं. गिरगाव येथील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात आलियाने गोंडस मुलीला जन्म दिला.

मुलीच्या जन्मापासून कपूर आणि भट्ट या दोन्ही कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दोघांवर चाहत्यांनी आणि सेलिब्रेटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला. आलिया आणि रणबीर आपल्या मुलीचं नाव काय ठेवणार याची उत्सुकताही तमाम चाहत्यांना होती. ती आता शमली असून आलियाने मुलीच्या नावाची घोषणा केली आहे. रणबीरची आई नीतू कपूर यांनी आपल्या नातीचं नाव ठेवल्याचं आलियाने सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.

आलिया आणि रणबीरच्या मुलीचं नाव राहा असं ठेवण्यात आलं आहे. याचा अर्थ दिव्य मार्ग, स्वाहिली भाषेत आनंद, संस्कृतमध्ये वंश, बांगला भाषेत विश्रांती, अरेबिक भाषेत शांती तसंच आनंद, स्वातंत्र्य आणि आशीर्वाद असा होतो. या सर्व भावनांचे अर्थ आम्हाला तिला पहिल्यांदा कुशीत घेतल्यावर समजले, अशी कॅप्शन आलियाने शेअर केलेल्या फोटोखाली दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)