Brahmastra Movie – ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवरील रणबीर-आलियाचा फोटो व्हायरल

दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची चर्चा जोरात सुरू आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची प्रमुख भूमिका आहे. गेल्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, मात्र लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण होऊ शकले नव्हते. मात्र आता या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले असून रणबीर-आलिया यांचा सेटवरचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दिग्दर्शक अयान मुखर्जी (Ayan Mukherjee) हे देखील दिसत आहेत.

अभिनेत्री आलिया भट्ट हिने ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवरील दोन फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. यातील एका फोटोत ती, रणबीर आणि अयान असे तिघे काली मातेच्या मूर्तीसमोर पाठमोरे उभे असल्याचे दिसते. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिघेही खूर्चीत बसलेले आहेत. फोटोमध्ये तिघेही खूपच खुश दिसत आहेत.

आलियाने या फोटोसोबत एक कॅप्शनही दिली आहे. या प्रवासाचा हिस्सा बनून खूप आनंदी आहे, आणि हे सर्व या दोन जादुगार मुलांमुळे पूर्ण झाले, असे म्हणत आलियाने याचे श्रेय रणबीर कपूर आणि अयान मुखर्जी यांना दिले.

दरम्यान, मोठ्या पडद्यावर एकत्र काम करण्याची आलिया आणि रणबीर यांची ही पहिलीच वेळ आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दोघेही एकमेकांच्या खूपच जवळ आले आणि दोघांनी आपले रिलेशनशीप कधी लपवूनही ठेवले नाही. दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. ब्रह्मास्त्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोघे कायमचे ‘एक दुजे के’ होतील असा अंदाज आहे.

500 कोटींचे बजेट

‘ब्रह्मास्त्र’ हा बॉलिवूडमधील आतापर्यंतच सर्वात बीग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटाचे बजेट 500 कोटी रुपये असून आलिया-रणबीर व्यतिरिक्त अमिताभ बच्चनही या चित्रपटात दिसणार आहे. तीन भागांमध्ये हा चित्रपट तयार केला जाणार असून याचा पहिला भाग लवकरच प्रदर्शित होईल.

आपली प्रतिक्रिया द्या