आलियाला करायची आहे सीतेची भूमिका

51

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटला रामायणातील सीता हे पात्र साकारायचं आहे. तिला अशी सीता साकारायची आहे जी लोकांना माहीत नाही. लेखक अमिश त्रिपाठी यांच्या ‘सीता- वॉरियर ऑफ मिथिला’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या समारंभात बोलताना आलियानं ही माहिती दिली. या पुस्तकात सीतेच्या जन्मापासून ते सीताहरणपर्यंतची गोष्ट आहे.

यावेळी अमिशने सांगितलं की, या पुस्तकावर सिनेमा बनवण्यसाठी माझी बोलणी सुरू आहे. तसेच रामाच्या भूमिकेसाठी रणवीर सिंह हा योग्य असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच आलिया सीतेच्या भुमिकेसाठी योग्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. आलिया ही भुमिका उत्तमपणे निभावेल असा विश्वासही त्यांनी दाखवला. मात्र कोणाला कोणती भूमिका द्यावी हे पूर्णत: दिग्दर्शकावर अवलंबून आहे हेही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या पुस्तकावर सिनेमा येणार का? आणि त्यात रणवीर, आलिया यांची भुमिका दिसणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

आपली प्रतिक्रिया द्या