किरकोळ वादातून पतीकडून पत्नी आणि मुलांची हत्या

1078

किरकोळ वादातून पतीने  पत्नी आणि 2 चिमुरड्यांची दोरीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक आणि तितकीच हृदयद्रावक घटना माणगाव तालुक्यातील दहिवली गावात घडली आहे. सुहानी संतोष शिंदे (36) पवन शिंदे (5) आणि संचित शिंदे (2) अशी मृतांची नावे आहेत. गोरेगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. आरोपी पती संतोष शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आरोपी संतोष याचे कुटुंब मोलमजुरी करते. वारंवार पतिपत्नी मध्ये किरकोळ कारणांवरुन नेहमी खटके उडत असतं. रात्रीदेखील दोघांमध्ये वाद झाला होता. त्या रागातून संतोषने पत्नी व लहानग्या दोन मुलांचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला.

किरकोळ वादातून संतोषने एवढे टोकाचे पाऊल उचलले याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी पती संतोष याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या