पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने स्वतःवर चाकू मारून संपविले जीवन

547
murder-knife

पती पत्नीमध्ये घरगुती भांडणातून शिक्षिका पत्निने भाजी कापण्याचा चाकू घेऊन स्वतःवर वार करून आपले जीवन संपविल्याची घटना मांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पूनम शर्मा (38) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत मांडवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके अधिक तपास करीत आहेत.

अलिबाग तालुक्यातील धोकवडे 2 येथे पूनम शर्मा या आपले पती आणि मुलगा यांच्यासोबत राहत होते. पूनम या उच्चशिक्षित शिक्षिका असून एका खाजगी शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवीत होत्या. पूनम यांचे पती हे चालक म्हणून काम करीत आहेत. पूनम यांचे 17 वर्षाचे वैवाहिक जीवन होते. मात्र पती आणि पत्नी मध्ये घरगुती वाद निर्माण होते.

17 फेब्रुवारी रोजी रात्री दोघा पतिपत्नी मध्ये वाद निर्माण झाला. रोजच्या वादाला कंटाळून अखेर पूनम यांनी भाजी कापण्याचा सुरा घेऊन स्वतः छातीवर वार केला. त्यानंतर पूनम या बेशुद्ध पडल्या त्यांना झिराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र प्रकृती नाजूक असल्याने अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासले असता वार वर्मी लागला असल्याने पूनम याना मृत घोषित केले. मांडवा पोलीस ठाण्यात सी आर पी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने आपला जीव गमावला असल्याने पतीवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या