‘हे’ रेडिओ स्टेशन साधते एलियन्सशी संपर्क, रशियातून होते प्रसारित..

1066

एलियन्सबद्दल मानवाला प्रचंड कुतूहल आहे. खरोखरच एलियन्सचे अस्तित्व आहे का? यावर चर्चा होत असतात. मात्र एक असं रेडिओ स्टेशन आहे ज्याने एलियन्सशी संपर्क केल्याचा दावा केला आहे. या रेडिओ स्टेशनचे नाव ‘द बजर’ असं आहे. या रेडिओ स्टेशनला 4625 आणि 4810 kHz या फ्रिक्वन्सीवर ऐकता येतं. हे रेडिओ स्टेशन सध्या खूप चर्चेत आहे. या रेडिओ स्टेशनवरून कोणता चांगला कार्यक्रम प्रसारित होत, म्हणून हे चर्चेत नसून, येथून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात 24 तास विचित्र आवाज येतो म्हणून लोक हे रेडिओ स्टेशन ऐकतात. याला ‘घोस्ट स्टेशन’ असे ही म्हटले जाते.

या रेडिओ स्टेशनच्या ब्रॉडकास्ट्समध्ये नियमित विचित्र आवाज ऐकायला येतात. असे आज नाही तर गेले बर्‍याच वर्षांपासून घडत नाही. हा आवाज कुठून येतो, हे कोणालाच माहिती नाही? सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, हे रेडिओ स्टेशन कोण चालवित आहे? हे कोणालाही माहिती नाही. मात्र आपण गुगलवर सर्च केलं तर अशी माहिती समोर येते की, हे रेडिओ स्टेशन रशियन सशस्त्र सेनेतर्फे चालवले जात आहे. मात्र रशियन सरकार या स्टेशनबद्दल काहीही बोलण्यास टाळाटाळ करीत आहे.

या रेडिओ स्टेशनवरून गेल्या 35 वर्षांपासून कार्यक्रम प्रसारित केले जात आहे. परंतु या विचित्र आवाजाबद्दल कोणालाही काही माहिती नाही. याबाबत बोलताना अनेक लोक असं बोलतात की, या स्टेशनमार्फत रशियन सैन्य आपल्या पाणबुड्यांशी संपर्क करतात. तर काही लोकांनाच म्हणणं आहे की, या रेडिओ स्टेशनच्या सहाय्याने ते एलियन्सशी संपर्क करतात. दरम्यान, याच्या सत्यतेबद्दल अजूनही शंका व्यक्त केली जात आहे. रेडिओवरती ऐकू येणार हा आवाज कोणाचा आहे, अजूनही याबाबत वास्तव समोर आलेलं नाही आहे.

आपली प्रतिक्रिया द्या